Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 4902

‘शहर बससेवेबाबत पुढील सभेत विस्तारित प्रस्ताव द्या’

$
0
0

महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करण्याचा विस्तारित प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले. यापूर्वी अकोला प्रवासी वाहतूक संघटनेकडून शहर बससेवा सुरू असताना झालेल्या चुकांचा विचार करून प्रशासनाकडून हा प्रस्ताव तयार केला जावा, असे त्यांनी सांगितले. स्थायी समितीचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करण्याचा ठराव मांडला.
शहरातील रिक्षांची टप्पा वाहतूक मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना मीटरने भाडे द्यावे लागले. रोजच्या पेक्षा अधिक पैसे खर्च करावे लागत असल्याने शहरात परिवहन महामंडळाकडून अधिकच्या बस देण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून केलेल्या या उपाययोजनांबाबत नगरसेवकांनी परिवहन मंत्र्याचे आभार मानले. बसची अपुरी संख्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्याची दखल मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आली.
महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करायची असेल तर मागील त्रुटींचा अभ्यास केला जावा, असे नगरसेवक राजू वैद्य म्हणाले. पूर्वी शहर बससेवेत ठेकेदाराचाच लाभ झाला. राजू शिंदे यांनी शहर बस चालविणाऱ्या ठेकेदाराचे बँक खाते स्वतंत्र ठेवून त्याला परस्पर पैसे काढण्याचे अधिकार दिल्यामुळे महापालिका अडचणीत आली आणि ही योजना बंद करावी लागली. अर्थकारण नीट सांभाळले जावे, महापालिकेवर भुर्दंड पडू नये. किमान नफा व्हावा, अशा पद्धतीने प्रस्ताव तयार करावा, तरच खासगी संस्थेच्या माध्यमातून शहर बससेवा सुरू करण्यास मान्यता द्यावी, असे सांगितले.
चर्चेत माधुरी अदवंत, राजेंद्र जंजाळ, राजगौरव वानखेडे यांनी सहभाग घेतला. अकोला प्रवासी वाहतूक संघटनेबरोबर न्यायाधिकरणात सुरू असणाऱ्या लढय़ाबाबतची माहिती नगरसेवकांनी द्यावी, अशी मागणी नंदकुमार घोडेले यांनी केली. चर्चेदरम्यान अफसर खान हे ओरडून बोलल्यामुळे महापौर तुपे त्यांच्यावर चांगलेच डाफरले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


Viewing all articles
Browse latest Browse all 4902

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>