Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 4902

नगरच्या पालखीत बसून तुळजाभवानीचे सीमोल्लंघन

$
0
0

आई राजा उदे उदेच्या जयघोषात कुंकवाची मुक्त उधळण करीत तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रातील दसऱ्याचे सीमोल्लंघन शुक्रवारी उत्साहात साजरे झाले. हजारो भाविकांनी पहाटे साडेपाच वाजता मोठय़ा भक्तिभावाने दर्शन घेतले.
महोत्सवातील रोमहर्षक धार्मिक विधी महानवमीदिनी पहाटे भक्तिमय वातावरणात पार पडला. िभगारच्या मानाचे तेली विजय भगत यांच्या परंपरेने येणाऱ्या पालखीत भवानीमातेची मूर्ती बसविण्यात आली. तुळजाभवानीचे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, बुबासाहेब पाटील, सचिन पाटील, भाऊसाहेब मलबा, धनंजय पाटील, शशिकांत पाटील, दिगंबर पाटील, शिवराज पाटील, सचिन परमेश्वर, विलास सोंजी, अनंत परमेश्वर, संभाजी पाटील, युवराज भये, शिवाजी परमेश्वर, विनोद सोंजी, विकास परमेश्वर यांच्यासह इतर भोपे पुजाऱ्यांनी देवीची मूर्तीस १०८ साडय़ांचे िदड गुंडळण्याचा विधी पूर्ण केला. िदड गुंडाळल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता शुक्रवार पेठ भागातून वाजतगाजत नगरच्या पलंग पालखीचे मंदिरात आगमन झाले.
पहाटे पाच वाजता नगरच्या पलंग व पालखीचे देवीच्या गाभाऱ्यात आगमन झाल्यानंतर भोपे पुजारी बांधवांनी देवीची मूर्ती पालखीत बसविली. त्यानंतर आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदेच्या जयघोषात बाहेर आणण्यात आली. गाभाऱ्याच्या बाहेरील भाविकांनी देवीच्या पालखीवर फुले व कुंकवाची मुक्त उधळण करीत जगदंबेचा जयघोष केला. राजाभाऊ गोंधळी यांच्यासह इतर गोंधळी बांधवांनी देवीची मूर्ती उचलण्यापासून सीमोल्लंघन पूर्ण होईपर्यत गगनभेदी संबळाचा निनाद केला. संबळाचा निनाद व आई राजा उदे उदेच्या जयघोषाने सारा मंदिर परिसर दणाणून निघाला.
मंदिरातील सीमोल्लंघन िपपळाच्या पारावर होते. तेथेही देवीचे भोपे पुजारी सोवळे परिधान करून, कपाळी मळवट माखून उभे होते. सभोवताली भाविकांची प्रचंड गर्दी होती. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी व हजारो भाविक या वेळी उपस्थित होते. नगरहून पालखीचे मानकरी विजय भगत, अभिषेक भगत, राजेंद्र भगत, सुभाष भगत, कुणाल भगत, अर्जुन भगत, अजिंक्य भगत, दुर्गा भगत यांच्यासह इतर २०० मानकरी नगर जिल्हय़ातील िभगार येथून पलंग व पालखीसोबत तुळजापुरात आले होते.
शुक्रवार पेठेत पलंग व पालखी मानाच्या ठिकाणी सायंकाळी ७ वाजता दाखल झाल्या. सीमेवर नगराध्यक्षा जयश्री कंदले, विजय कंदले, व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी या दाम्पत्याने पालखीचे स्वागत केले. शहरातील राजे संभाजी तरुण मंडळाने पालखीचे दिमाखदार स्वागत केले. विशाल छत्रे, प्रशांत इंगळे आदींनी मानकऱ्यांच्या सेवार्थ स्टॉल उभारला होता. संस्कार भारतीच्या सतीश महामुनी, पद्माकर मोकाशे, लक्ष्मीकांत सुलाखे, आण्णा शेटे, अण्णा महामुनी, शिवाजी भोसले राजे संभाजी तरुण मंडळाने विशाल रांगोळी रेखाटन करून स्वागत केले होते.
कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पालखी मार्गावर नगरपालिकेने दिव्यांची व्यवस्था केली हाती. मध्यरात्री निघालेल्या पलंग व पालखी मिरवणुकीने मंदिरात आली. साडेतीन वाजता पावणारा गणपती चौक व साडेचार वाजता आर्य चौकात पालखी आली. पाच वाजता तुळजाभवानी मंदिरात दाखल झाल्यानंतर मुख्य उत्सवास प्रारंभ झाला.


Viewing all articles
Browse latest Browse all 4902

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>