आदर्श संसद ग्रामसाठी निवड झालेल्या पोहनेर गावात पाण्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. विजयादशमीच्या दिवशी हा प्रकार घडला. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने सर्वार्थाने गाव आदर्श करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गालबोट लागले.
परळी तालुक्यातील पोहनेर गाव भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आदर्श संसद ग्रामसाठी निवडले असून, गावात सरकारच्या अनेक योजना राबवून लोकांचे प्रबोधन करण्याचे उपक्रम सुरू आहेत. अशा स्थितीत विजयादशमीच्या दिवशीच पाण्याच्या बॉक्सवरून दोन तरुणांनी गावातीलच पांडुरंग रंगनाथ गायकवाड (वय २७) याच्यावर वार करून खून केला. या प्रकरणी नामदेव रामा लाकडे व ईश्वर लाकडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आनंदवाडीत सरपंचाची आत्महत्या
बीड शहरालगत आनंदवाडी येथील सरपंच सुधाकर राऊत यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकत्रे होते. काही दिवसांपूर्वी गावातील एका गटाबरोबर त्यांचे भांडण झाले होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करीत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांच्या नातेवाईकांनी केली.
↧
पोहनेरला पाण्यावरून तरुणाचा निर्घृण खून
↧