Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 4902

मशिदीसाठी ‘विठ्ठला’चा हातभार

$
0
0

मतांच्या राजकारणासाठी समाजात दुहीचे बीज पेरणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कार्य उमरगा तालुक्यातील जकेकूर गावात मशिदीच्या बांधकामाच्या रूपाने उभे राहिले आहे. विशेष म्हणजे या मशिदीच्या बांधकामाला चक्क ‘विठ्ठला’चा हातभार लागला आहे. समाजाला एकोप्याचा मार्ग दाखवू पाहणाऱ्या जकेकूरमध्ये ६३ वर्षीय विठ्ठल पाटील यांच्या पुढाकारातून भव्य मशीद बांधण्यात आली. तीन वर्षांत राज्यभर पायपीट करीत २५ लाख रुपयांची वर्गणी जमा करून पाटील यांनी गावच्या मुस्लिम बांधवांसाठी उभारलेली मशीद हे राष्ट्रीय एकात्मतेचे चालतेबोलते उदाहरण ठरले आहे.
हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या उमरगा तालुक्यात जकेकूर नावाचे छोटेखानी गाव आहे. जेमतेम सहाशे उंबरा असलेल्या या गावाची लोकसंख्या साडेतीन हजारांच्या घरात आहे. गावात जुनी मातीची छोटी मशीद होती. मात्र, तिची पडझड झाल्याने प्रार्थनेसाठी आलेल्या काही मुस्लिम बांधवांना दुखापत झाली. त्यामुळे ही मशीद पाडून टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
नवीन मशीद बांधण्याबाबत निर्माण झालेला आíथक गुंता गावातील विठ्ठल पाटील यांनी पुढाकार घेत सोडवला. स्वत:च्या पशाने पाटील यांनी मुंबई, उमरगा, गुलबर्गा, तळोजा, पनवेल, मुंब्रा, भिवंडी, लातूर, नांदेड, हैदराबाद अशा अनेक शहरांत मशिदीच्या बांधकामासाठी मदत मिळावी, म्हणून तीन वष्रे फिरून प्रयत्न केले. गावातील मशिदीच्या बांधकामासाठी तळमळीने वर्गणी मागणाऱ्या िहदू व्यक्तीच्या हाकेला अनेकांनी प्रतिसाद दिला आणि तब्बल २५ लाख रुपये देणगी गोळा झाली. यातून गावात आता आकर्षक मशीद उभारली आहे. गावच्या मंदिरातून उमटणाऱ्या घंटांचा निनाद आणि मशिदीच्या मिनारावरून येणारा अजानचा प्रतिध्वनी गावातील एकोपा स्पष्ट करतो.
मशीद बांधण्यासाठी तीन वर्षांत केलेला प्रवास विठ्ठल पाटील मोठय़ा आनंदाने सांगतात. मुंबईला वेगवेगळ्या व्यक्तींकडून देणगी मिळण्यासाठी ११ वेळा गेलो. गावात मशीद व्हावी, या साठी मुस्लिम बांधवांबरोबरच अनेक िहदूंनी भरभरून मदत केली. गावात मोहरम, ईद, दिवाळी, नवरात्र असे सगळे उत्सव एकत्रितरीत्या साजरे केले जातात. आषाढीच्या वारीत गावातील मुस्लिम बांधवही मोठय़ा संख्येने सहभागी होतात. त्यामुळे त्यांच्या प्रार्थनास्थळासाठी आपण एक पाऊल पुढे टाकल्याचे पाटील यांनी सांगितले.
विठ्ठल पाटील यांच्या मदतीमुळेच १२ फूट उंचीची जुनी मशीद पाडून नवीन भव्य मशीद उभी राहू शकली, अशी कृतज्ञतेची भावना ख्वाजामियाँ इनामदार यांनी व्यक्त केली. गावच्या या एकोप्यामुळे कधीच धार्मिक वा जातीय तणाव निर्माण झाला नाही, अशी प्रतिक्रिया मनुद्दीन पठाण यांनी व्यक्त केली. गावातील मंदिरासाठी मुस्लिमांनीही मदत केली. दरवर्षी हरिनाम सप्ताहला मुस्लिम बांधव उत्स्फूर्त देणगी देतात. मागील १६ वर्षांपासून गावातील अब्दुल तांबोळी न चुकता वारी करीत असल्याचे शहाजी पाटील यांनी सांगितले.
देशात एखादी अप्रिय घटना घडली तरी मशिदीत प्रेमाने एकमेकांना भेटणाऱ्या जकेकूरमधील िहदू-मुस्लिम बांधवांनी घालून दिलेला आदर्श हाच खऱ्या धर्माचा स्रोत असल्याची भावना येथील प्रत्येकाच्या मनात ओसंडून वाहत आहे.


Viewing all articles
Browse latest Browse all 4902

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>