Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 4902

गणेश विसर्जनाच्या दिवशी मारहाण; एकाचा मृत्यू, दोघांवर मुंबईत उपचार

$
0
0

गणेश विसर्जनाच्या दिवशी मारहाण केलेल्या तिघांपकी एकाचा उपचारदरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला, तर अन्य दोघांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. पोलिसांनी केज शहरातील सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. बीअरबार उघडून दारू देण्याच्या कारणावरून मारहाणीचा प्रकार घडला.
केज शहरात रविवारी गणेश विसर्जन सर्वत्र शांततेत सुरू असताना हॉटेल बंद असल्यामुळे कळंब रस्त्यावरील संतोष श्रीधर इंगळे यांच्या वैष्णवी हॉटेलसमोर संतोषसह राजाभाऊ गोडसे व विकास दत्तात्रय गुंड हे तिघे बसले होते. या वेळी मिरवणुकीतील काहीजण हॉटेलसमोर आले व त्यांनी हॉटेल उघडून दारू देण्यासाठी दमबाजी सुरू केली. सुरुवातीला बाचाबाची व नंतर हाणामारी झाली. या वेळी सहाजणांनी मिळून तिघांना गजाने व टॉमीने मारहाण केली. यात जखमी झालेल्या तिघांना सोलापूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी विकास गुंड याचा उपचार सुरू असताना गुरुवारी मृत्यू झाला, तर अन्य दोघांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. या प्रकरणी केज पोलिसांत सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एकास पोलिसांनी अटक केल्याचेही सूत्रांनी सांगितले.


Viewing all articles
Browse latest Browse all 4902

Trending Articles